Sustain Humanity


Friday, May 1, 2015

मे दिवसानिमित्त मुंबईमध्ये कार्यक्रम

   
Satya Narayan
May 1 at 10:08am
 
आंतरराष्ट्रीय कामगार दिवसाच्या निमित्ताने बिगुल मजदूर दस्ता आणि नौजवान भारत सभातर्फे मानखुर्द येथील लेबर चौकात, साठेनगर व अन्य ठिकाणी पथनाट्य, क्रांतिकारी गीत, सभा यांच्याबरोबर पत्रकांचे वितरण करून कामगारांना आपल्या हक्कांसाठी एकजूट होण्याचे आवाहन करण्यात आले. बिगुल मजदूर दस्ताच्या विराटने कामगारांना संबोधित करताना मे दिवसाच्या इतिहासाचा पिरचय करून दिला. आजपासून १३० वर्षांपूर्वी जगभरातील कामगारांनी कशाप्रकारे 'आठ तास काम, आठ तास आराम आणि आठ तास मनोरंजना'ची घोषणा दिली होती, याबद्दल त्यांनी सांगितले. शिकागोच्या कामगारांनी जेव्हा याच मागणीसाठी १ मे १८८६ रोजी शिकागोमध्ये जेव्हा मोठा संप पुकारला तेव्हा तेथील धनदांडग्यांचा थरकाप उडाला. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांनी पोलिस व गुंडांच्या मदतीने कामगारांच्या सभेवर गोळीबार करविला ज्यामध्ये ६ कामगार मारले गेले. त्यानंतर कामगारांचे मोठ्या प्रमाणात दमन करून त्यांना दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. ४ मे रोजी याचा विरोध करण्यासाठी कामगारांनी एका सभेचे आयोजन केले होते. या सभेत पोलिसांच्याच एक एजंटने बॉंब फेकला व त्याचे खापर कामगारांच्या माथ्यावर फोडले. त्यानंतर न्यायाचे नाटक करून आठ कामगार नेत्यांवर खटले भरण्यात आले व चार जणांना फाशी व इतरांना आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. १ मे १८८७ ला जगभरातील कामगारांनी हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. शिकागोचे कामगार आंदोलन रक्ताच्या चिखलात बुडवण्यात आले होते परंतु त्यानंतर जगभरातील कामगारांनी संघर्ष करून आठ तासांच्या कार्यदिवसाचा अधिकार मिळवला. म्हणून जगभरातील कामगारांचा हाच खरा उत्सव आहे.
नौजवान भारत सभाच्या सत्यनारायणने सांगितले की आज भारतात ९३ टक्के म्हणजेच जवळपास ५६ कोटी कामगार असंघटित आहेत व रोजंदारी किंवा कंत्राटी पद्धतीवर काम करीत आहेत. त्यांना कोणत्याही श्रमसुरक्षा प्राप्त नाहीत, बहुतेक ठिकाणी आठ तासांपेक्षा जास्त काम करवून घेतले जाते व किमान मजुरीसुद्धा दिली जात नाही. अशा वेळी आज त्यांना संघटित होऊन आपले अधिकार मिळवावे लागतील. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर ज्या गतीने श्रमकायदे मालकांच्या सोयीनुसार बदलले जात आहेत, कामगारांना कामावरून कमी करण्याबाबत, पर्यावरणाचा ऱ्हास करण्यास कायद्यानेच खुला परवाना दिला जात आहे, त्यामुळे येत्या काळात भारतातील असंघटित कामगारांची अवस्था अधिकाधिक बिकट होणार आहे. म्हणूनच, आपली अवस्था बदलण्यासाठी आज आपल्याला मे दिवसाच्या हुतात्म्यांचे स्मरण करून त्यांच्या मार्गावरून चालण्याची आवश्यकता आहे.
या कार्यक्रमा दरम्यान क्रांतिकारी गीते तसेच मे दिवस हे पथनाट्य सादर करण्यात आले व हजारो पत्रके वाटण्यात आली.
मे दिवसानिमित्त मुंबईमध्ये कार्यक्रम
मुंबई, १ मे २०१५. आंतरराष्ट्रीय कामगार दिवसाच्या निमित्ताने बिगुल मजदूर दस्ता आणि नौजवान भारत सभातर्...

No comments:

Post a Comment