'राजपथा'चे रुपांतर झाले 'योगपथा"मध्ये..!
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संयुक्त राष्ट्रसंघास प्रथमच संबोधित करताना मांडलेल्या संकल्पनेनुसार आज (रविवार) 21 जून हा दिवस भारतासहित जगात इतरत्रही आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी देशाच्या राजधानीमध्ये राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिल्ली राज्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, इतर महत्त्वपूर्ण नेते आणि हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये योगदिनाचा सोहळा संपन्न झाला.
योग दिनानिमित्त दिल्लीमधील राजपथ येथे हजारो नागरिकांनी योगासने करीत या मोहिमेमध्ये आपला उत्फुल्ल सहभाग नोंदविला. पंतप्रधानांनी यावेळी देशास संबोधित करताना आंतरराष्ट्रीय योग दिन हा केवळ एक दिवस नसून शांतता व आनंदी साहचर्याच्या नव्या युगाच्या दिशेने टाकण्यात आलेले पहिले पाऊल असल्याची भावना यावेळी व्यक्त केली. आज भारतासहित जगभरातील तब्बल 177 देशांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे.
"हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ व इतर देशांनी केलेल्या सहकार्याबाबत मी त्यांचे आभार मानतो. याचबरोबर, योगविद्येस मोठे योगदान दिलेल्या ऋषी, मुनींना माझे नमन असो. राजपथाचे रुपांतरही कधीतरी योगपथामध्ये होईल, अशी कोणी कल्पना तरी केली होती काय?! सध्याच्या जगामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाच्या विकासाने सर्वच घटकांची प्रगती होते आहे. मात्र या भौतिक प्रगतीच्या तुलनेमध्ये मानवच मागे पडल्याची परिस्थिती निर्माण होता कामा नये. अशा वेळी शांततेच्या मार्गावर तणावविरहित जीवन जगणे हे फार मोठे आव्हान आहे. आज आपण केवळ एक दिवस साजरा करत नसून सद्भावनेच्या काळाची नवी सुरुवात करण्यासाठी मानवी मनास प्रशिक्षित करतो आहे,'' असे पंतप्रधान मोदींनी यावेळी बोलताना सांगितले.
दरम्यान, दिल्लीसहित देशामध्ये इतरत्रही योग दिन उत्साहात साजरा करण्यात येत असल्याचे वातावरण आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लखनौमध्ये, केंद्रीय उर्जा मंत्री पीयुष गोयल यांनी मुंबईमध्ये व इतर राज्यपातळीवरील नेत्यांनी राज्यांमध्ये साजऱ्या करण्यात आलेल्या योगदिनामध्ये सहभाग घेतला. मुंबईमध्ये भर पावसामध्येही मरीन ड्राईव्ह येथे साजऱ्या करण्यात आलेल्या योग दिनामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आज सकाळी नागपूरमध्ये योग दिन साजरा करण्याच्या मोहिमेमध्ये सहभाग घेतला.
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या सध्या न्यूयॉर्कमध्ये असून राष्ट्रसंघामध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या समारंभामध्ये त्या भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. या समारंभास राष्ट्रसंघाचे सरचिटणीस बान की मून हेदेखील उपस्थित राहणार आहेत.

सहभागींची योगासने व्यवस्थित पाहता यावीत म्हणून राजपथावर दोन हजार डिजिटल सिनेमा स्क्रिन बसविण्यात आले आहेत. याशिवाय नवी दिल्लीबरोबरच लखनौ, पाटणा आणि कोलकता येथेही कार्यक्रम होणार असून, दूरदर्शनबरोबरच इंटरनेटवरही हा कार्यक्रम पाहता येईल. या निमित्ताने टपाल खात्याच्या विशेष तिकिटांचे प्रकाशन आणि अर्थ मंत्रालयाने काढलेल्या दहा आणि शंभर रुपयांच्या नाण्यांचे अनावरण राजपथावर होणार आहे.
दरम्यान, दिल्लीसहित देशामध्ये इतरत्रही योग दिन उत्साहात साजरा करण्यात येत असल्याचे वातावरण आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लखनौमध्ये, केंद्रीय उर्जा मंत्री पीयुष गोयल यांनी मुंबईमध्ये व इतर राज्यपातळीवरील नेत्यांनी राज्यांमध्ये साजऱ्या करण्यात आलेल्या योगदिनामध्ये सहभाग घेतला. मुंबईमध्ये भर पावसामध्येही मरीन ड्राईव्ह येथे साजऱ्या करण्यात आलेल्या योग दिनामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आज सकाळी नागपूरमध्ये योग दिन साजरा करण्याच्या मोहिमेमध्ये सहभाग घेतला.
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या सध्या न्यूयॉर्कमध्ये असून राष्ट्रसंघामध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या समारंभामध्ये त्या भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. या समारंभास राष्ट्रसंघाचे सरचिटणीस बान की मून हेदेखील उपस्थित राहणार आहेत.
No comments:
Post a Comment